कणकवली कॉलेज येथे १९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सव

जिल्हास्तरीय रानभाज्या पाककृती स्पर्धा व रानभाज्या प्रदर्शन

⚡कणकवली ता.१८-: कणकवली कॉलेज, कणकवली व सायन्स असोसिएशन आणि स्नेह सिंधु कृषि पदवीधर संघ, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, आत्मा कृषि विभाग सिंधुदुर्ग व उमेद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १.३० ते सायंकाळी ५:३० वा. या कालावधीत रानभाज्या महोत्सव २०२३ अंतर्गत जिल्हास्तरीय रानभाज्या पाककृती स्पर्धा व रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन कणकवली कॉलेज, कणकवली येथे केले आहे.

यंदाचे हे दुसरे वर्ष असून, या वर्षी कणकवली कॉलेज, कणकवलीच्या बरोबर स्नेह सिंधु कृषि पदवीधर संघ, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, आत्मा कृषि विभाग सिंधुदुर्ग व उमेद सिंधुदुर्ग आशा सरकारी व निम-सरकारी संस्था असून त्यांच्या सहयोगातून या वर्षीचे रानभाज्या पाककृती स्पर्धा व छायाचित्रासहित रानभाज्यांच्या महितीसह प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या बरोबरीनेच सर्व सामान्याना रानभाज्याच्या उपयोगी गुणधर्मा बाबत माहिती व्हावी या करिता आयोजकानी दोन व्याखाने ठेवलेली आहेत. सिंधुदुर्गातील रानभाज्या या पुस्तकाचे लेखक डॉ. बाळकृष्ण गावडे हे रानभाज्यांची ओळख तर डॉ. नीलेश कोदे हे रानभाज्यांचे आहारातील महत्व विशद करतील याचा सर्वांनी लाभ घ्याच्या असे आवाहन कॉलेज चे प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालिंग व शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. सौ. राजश्री साळुंखे यांनी केले आहे.
ही स्पर्धा ही प्रामुख्याने पारंपरिक पाककृतीवर आधारित असून या स्पर्धेमध्ये भाग घेवू इच्छिणान्या सहभागिनी एक स्पर्धक एकच रानभाजी सादर करणे बंधनकारक असून, सदर रानभाजीची पाक कृती ही पारंपारिकच असली पाहिजे व त्या बरोबर पाककृती लिहून सादर करायची असून त्यासोबत रानभाजीची ओळख व्हावी या करिता एखादी रानभाजीचे रोपटे पेडी/खुडलेली भाजी पाककृती सोबत ठेवायची आहे. स्पर्धेमधील विजेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्याना व दोन उप विजेत्यांना बक्षिसाच्या रुपात आकर्षक साड्या दिल्या जातील. या बक्षिसाचे प्रायोजकत्व आदर्श विहीर बांधकाम व्यवसायिक में. रेश्मा कन्स्ट्रकशन यांनी स्वीकारले आहे. साधारणतः २०० महिला या स्पर्धेत सहभाग नोंदवीतील असे त्याचे नियोजन असून आयोजकानी उमेद सिंधुदुर्ग यांना १५० प्रवेशिका, आत्मा- कृषि विभाग सिंधुदुर्ग यांना १० प्रवेशिका रोटरी क्लब कणकवली सेंट्रल यांना ५० प्रवेशिका, स्नेह सिंधु पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांना ५० प्रवेशिका, कणकवली कॉलेज, कणकवली येथे ५० प्रदेशका व श्री अशोक एजन्सी, बाजारपेठ कणकवली यांच्याकडे २५ प्रवेशिका उपलब्ध केल्या असून सदर ठिकाणाहून जास्तीत जास्त स्पर्धकांनी त्या घ्याव्यात असे आवाहन आयोजकानी केले आहे. स्पर्धकानी दुपारी १:३० वाजता पासून नाव नोंदणी करावी, स्पर्धकाना नाव नोंदणी करताना नंबर दिला जाईल त्याच नंबरवर आपली रानभाजीची मांडणी करायची आहे या बाबती नियमावली प्रवेशिकमध्ये दिली आहे. स्पर्धेच्या दिवशी सुद्धा प्रवेशिका स्वीकारल्या जातील याची कृपया नौद घ्यावी. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांमध्ये जिल्हाधिकारी मा. के. मंजूलक्ष्मी, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रांताधिकारी कणकवली, तहसीलदार कणकवली, कृषि अधीक्षक सिंधुदुर्ग, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे पदाधिकारी, सर्व आयोजक संस्थाचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page