सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांची मागणी..
⚡आंबोली,ता.१८-: येथील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलीमेडिसिन सुरू करण्याची आवश्यकता असून जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी ,जिल्हाधिकारी यांनी तसा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.
येथील आंबोली आरोग्य केंद्रात १५ गावांचा समावेश असून १६ किलोमीटर घाट क्षेत्र असून थंड हवेचे आणि अति पावसाचे ठिकाण आहे.येथील आरोग्य केंद्रात डॉ.महेश जाधव आणि आदिती पाटकर या कार्यरत असून दोन्ही डॉक्टरांचे काम चांगले आहे. जिल्ह्यात डिलिव्हरी रुग्ण तसेच इतर बाबतीत आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक आहे.दोन्ही डॉक्टर हे बीएएमएस आहेत. डॉक्टरांचे काम चांगले आहे.मात्र अनेक गोष्टी आणि सुविधा नाहीत.एम बी बी एस पोस्ट नाही.मात्र टेलिमेडिसिन सुविधा सुरू केल्यास अनेक तज्ञांच्या सल्ल्याने रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे.याचा फायदा देखील अपघात तसेच गंभीर आणि इतर आजार असणाऱ्या लोकांना देखील होईल.त्यामुळे या ठिकाणी ही सुविधा सुरू करावी. जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसा प्रस्ताव शासनाला सादर करावा.खासदार विनायक राऊत यांच्याकडे तसेच आरोग्य च्या प्रधान सचिव यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी सांगितले.आरोग्यच्या प्रश्नाकडे शासनाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.
