Headlines

एकमुखी दत्तमंदिरात 33 श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०५-: अधिक मासाचे औचित्य साधून आज वेंगुर्ला शहरातील एकमुखी दत्त मंदिरात 33 श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न झाल्या. सध्या श्रावण अधिक मास सुरु असून “अधिकस्य अधिकं फलंम्’ यानुसार ठिकठिकाणी पूजा, कीर्तन, नामस्मरण, भागवत सप्ताह आदींचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकमुखी दत्तमंदिरात 33 श्रीसत्यनारायण महापूजा बांधण्यात आल्या. ब्रााहृणांच्या मंत्रघोषात यजमानांनी मनोभावे पूजा केल्या. त्यांनी बहुसंख्य…

Read More

मोरगाव केंद्र शाळेत आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिन साजरा

⚡बांदा ता.०५-: सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहिर करण्यात आले असून या तृणधान्या विषयी विद्यार्थ्यांच्या मध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून जिल्हा परिषद केंद्र शाळा मोरगाव नंबर एक शाळेत विविध तृणधान्याविषयी जनजागृती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. यावेळी परिसरात उपलब्ध असलेल्या तांदूळ मका ,नाचणी,वरी, गहू, बाजरी इत्यादी धान्यांची ओळख व्हावी…

Read More

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी हक्क कृती समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी व कोकण विभाग प्रभारी पदी मिहीर बुद्धिधन तांबे

⚡मालवण ता.०५-: महाराष्ट्र राज्य विद्यार्थी हक्क कृती समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी व कोकण विभाग प्रभारी पदी मालवण तालुक्यातील वेरली येथील मिहीर बुद्धिधन तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र विद्यार्थी हक्क कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष चेतन पाटील व संस्थापक सचिव रामराजे काळे यांनी मिहीर तांबे यांना दिले आहे. विद्यार्थी चळवळीतील मिहीर तांबे यांच्या योगदानाची…

Read More

स्त्रीरोग तज्ञ डॉ. दुर्भाटकर याच्या शुभहस्ते उद्या ‘वन रुपी क्लिनिक’चा शुभारंभ

⚡बांदा ता.०५-: सावंतवाडीचे सेवाभावी स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या संकल्पनेतून आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या पुढाकारातून उद्या ‘वन रुपी क्लिनिक’चा शुभारंभ होत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त म्हणजे फक्त एक रुपयात आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील अनेक डॉक्टर या क्लिनिक मध्ये सामाजिक भावनेतून काम करणार आहेत. ज्यामध्ये कान, नाक,…

Read More

इंटरनॅशनल ओलिंम्पियाड परीक्षेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.०५-: सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल ओलिंम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे . यामध्ये इ . २ री तील कु . कु.नहुश पारगावकर , इ .३तीलकु .अलिझा शेख यांनी सुवर्णपदक , इ . २री तील कु . नसरीन मल्लिक ,कु . फैजान खान , कु. निहान रावराणे , कु . आद्या जोशी यांनी…

Read More

प्रशासकिय अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही – सुनील सौदागर

⚡वेंगुर्ला ता.०५-: आज काळ बदलला आहे. हि संगणकिय व इंटरनेट शिक्षणाचे युग आहे. नोकऱ्यांसाठी त्या त्या शिक्षणाच्या संकल्पनेनुसार तसे शिक्षण हि काळाजी गरज बनली आहे. प्रशासकिय अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही. तसेच आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीनुसार दुरदृष्टीने शिक्षण घेतल्यास उद्योग व्यवसायांतून सुध्दा आपण मोठे बनू शकतो. असे प्रतिपादन सुनील सौदागर यांनी केले. मल्टी स्किल…

Read More

मळगाव येथे उद्या “आशिर्वाद गुरुमाऊलींचा कार्यक्रम…

जगदंब संगीत विद्यालयाच्यावतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.०५ सहदेव राऊळ : उद्या रविवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० वाजता खानोलकर मंगल कार्यालय (मालक सुधीर भागवत) येथे जगदंब संगीत विद्यालयाचा (संचालक गुरूवर्य रूपेश पोवार) ‘आशिर्वाद गुरूमाऊलीचा’ कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात विद्यालयाच्या मुलांचे पखवाज, तबला सोलो वादन, भजन वादन होणार आहे. या कार्यक्रमास सिंधुदुर्गातील भजन दशावतार आणि डबलबारी क्षेत्रातील…

Read More

अनिल गोवेकर यांच्याकडून क्रीडा साहित्य प्रदान

⚡वेंगुर्ला ता.०५-: उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना व शाळा संस्थेस क्रीडा क्षेत्रात भरघोस यश मिळवून देणारे क्रीडाप्रेमी, शिस्तप्रिय, विज्ञाननिष्ठ, सामाजिक कार्यकर्ता व साहित्य – सांस्कृतिक क्षेत्रात लौकिकप्राप्त क्रीडाशिक्षक अनिल गोवेकर हे नियत वयोमानानुसार काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. यावेळी झालेल्या सत्कारावेळी त्यांनी क्रीडासाहित्य देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी कॅरम बोर्डस, बुद्धिबळ सेटस, बॅट व…

Read More

कोळंब येथे गणेश चतुर्थी सणाच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन

⚡मालवण ता.०५-: उमेद, ग्रामपंचायत कोळंब व समर्थ हॉल कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थीसाठी लागणारे सर्व वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री अर्थात ‘संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची’ हा मालवण तालुका मर्यादित उपक्रम दि. ९ ते १७ सप्टेंबर या कालावधीत समर्थ हॉल कोळंब मालवण याठिकाणी आयोजित आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या अनेक उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देणे…

Read More

कै सुभाष मोर्ये यांचे कार्य पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल

शोकसभेत अनेकांनी व्यक्त केले विचार बांदा ता.०५-: बांदा गावचे सुपुत्र कै सुभाष मोर्ये हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सखोल अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व होते. अनेकांना संकटकाळी मदत करणारे व कोणतेही काम करण्यासाठी प्रेरणा देणारे असे मोर्ये सरांचे काम होते. लहानापासून थोरांपर्यंत समीप होऊन ते आपले कार्य पुढे घेऊन जात असत ते नेहमी म्हणायचे की…

Read More
You cannot copy content of this page