चालकाला काढले बाहेर; चतुर्थीच्या काळात नगरपालिकेने कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळथांबवा; विलास जाधव
⚡सावंतवाडी ता.१६-: येथील गरड परिसरात इलेक्ट्रिक कचरा व्हेनचा अपघात होऊन गाडी पलटी झाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत संबंधित कर्मचाऱ्याला बाहेर काढले. परंतु त्याला कोणती दुखापत न झाल्याने मोठा अनार्थ टळला. परंतु गाडीचे किरकोळ नुकसान झाले.
दरम्यान याबाबत माजी नगरसेवक विलास जाधव म्हणाले नगरपालिकेने चतुर्थीच्या काळात नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ थांबवावा. अशा गाड्यांचे यापूर्वी देखील अपघात घडले आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना पुन्हा घडली तर याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील विलास जाधव यांनी यावेळी दिला. तसेच या गाड्यांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
