गणेश भक्तांच्या सोयीसाठी सुविधा केंद्रांचा उपक्रम

प्रभाकर सावंत:पालकमंत्री रविद्र चव्हाण यांची संकल्पना

⚡वेंगुर्ला ता.१६-: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अखत्यारीत कार्यरत असणारा सार्वजनिक बांधकाम विभाग एकजुटीने अहोरात्र मेहनत घेत विकासकामांना आकार देत आहे. मंत्री चव्हाण यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुंबई-गोवा सिगल लेन महामार्ग पूर्ण झालेला आहे. त्यातच गणेशभक्तांच्या सोयीसाठी सुविधा केंद्रांचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

  सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात अशी अनेक केंद्रे कार्यरत झाली आहेत आणि होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झारापपर्यंत चार पॉईंटवर उभारण्यात आलेल्या स्वागत व सुविधा केंद्रातून सेवा सुरू झाली आहे. या सुविधा केंद्रामार्फत आरोग्यसेवा, पोलीस मदत केंद्र, मोफत चहा बिस्कीट स्टॉल, चालकांसाठी विश्रांती कक्ष, फोटो गॅलरी आणि मोबाईल शौचालय व्यवस्था आदी मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. जेणेकरून गणेशभक्तांच्या प्रवासातील थकवा कमी होईल, अपघात होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.

  पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. चांगले काम करणा-या व्यक्तीला नाउमेद करण्यासाठी टिकाकारांची फौज ही नेहमीच तैनात असते. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत काम करणे हा रविद्र चव्हाण यांचा खाक्या आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भाजप सेवा आणी सुशासन यावर भर देतो या विधानाला या उपक्रमातून पुष्टी मिळाली असल्याचे मत श्री.सावंत यांनी व्यक्त केले.

  आज ओसरगाव टोल नाक्याजवळ उभारलेल्या सुविधा केंद्राला भेट दिली. तिथे भेटलेल्या प्रवाशांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.जिल्ह्यातील नागरिकांनी मुंबई पुण्याहून येणा-या आपल्या आप्तेष्टंना या सुविधा केंद्रांबाबत माहिती द्यावी असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page