बांदेश्वर दुग्ध सहकारी संस्थेकडून गणेशोत्सवाची भेट
बांदा/प्रतिनिधी
येथील बांदेश्वर दुग्ध सहकारी संस्था यांच्यावतीने आज संस्थेला नियमित दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर तसेच बांदेश्वर-भूमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन नारायण गावडे, उपाध्यक्ष बाळा आकेरकर, संचालक रत्नाकर आगलावे, मनोज सावंत आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
