इन्सुली नं. ५ मधील विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत यश

⚡बांदा ता.१६-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ मधील विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत १०० टक्के यश मिळविले.

या परीक्षेत सहापैकी सहा विद्यार्थी पात्र ठरले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. सदर परीक्षेत सोहा बिजली- 98 गुण, सिया नाईक- 90 गुण, साईश पाटील 84 गुण, रुद्रा सावंत- 72 गुण, प्रणव मुळीक- ७० गुण व विराज शेळके -70 गुण यांनी यश मिळविले. सदर विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सुधीर गावडे यांचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक धनंजय केरकर, भास्कर माजगावकर व हंसराज गवळे यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेकानंद नाईक व सर्व सदस्य, पालक तसेच केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page