⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा युवक संचालनालय,पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धां २०२३/२४ कॅरम स्पर्धा प्रकारात घवघवीत यश प्राप्त करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी मान मिळवलेला आहे.
प्रशालेतील इयत्ता ७वी तील खेळाडू विद्यार्थिनी कु साक्षी रमेश रामदुरकर (वयोगट-१४) मधून जिल्हास्तर कॅरम स्पर्धेत निवड होऊन विभागस्तरासाठी तसेच वयोगट १७ तून इयत्ता १०वी तील कु प्रणिता नथुराम आयरे व कु.स्वरा प्रसाद डेगवेकर व कु.स्वप्नील मंगेश लाखे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत यशस्वी होवून विभागस्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत.
या खेळाडू विद्यार्थ्यांनी शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
या खेळाडू विद्यार्थ्यांचे, क्रीडाशिक्षक श्री निलेश धारगळकर यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन.पी.मानकर, संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई, सचिव डॉ.प्रसाद नार्वेकर, संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कॅरमच्या विद्यार्थ्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
