Headlines

मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल निकाल ९९.३९ टक्के…

⚡मालवण ता.२७-: इयत्ता दहावीचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के एवढा लागला आहे. मालवण तालुक्यात ९९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४४९ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत १२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि २३ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

Read More

मोती तलावातील त्या मृतदेहाची ओळख पटली…

⚡सावंतवाडी ता.२६-: शहरातील मोती तलावात अज्ञाताचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना रविवारी उघडकीस आली. या अज्ञाताची ओळख पटली असून खेमाजी बाबुराव खंदारे (वय ७८) असे त्यांचे नाव आहे. भटवाडी भागात तो राहत होते. आज सकाळी बाजारातून जाऊन येतो असे सांगून ते घरातून निघाले होते. पण उशिरापर्यंत ते घरी न आल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली….

Read More

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू…

सावंतवाडी : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून अंजली वामन चव्हाण वय ५५ या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सावंतवाडी जिमखाना मैदान जवळील कॉम्प्लेक्स येथे ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या मृत महिलेचे १५ दिवसांपूर्वी डोळ्याचे ऑपरेशन झाले असल्याने तीला नीट दिसत नव्हते. सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त बालकनीत गेली असता तोल जाऊन दुसऱ्या…

Read More

रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा

रिक्षेत विसरलेली पर्स युवतीला केली परत !! ⚡मालवण ता.२६-:मालवण शहरात कुटुंबियांसमवेत रिक्षातून प्रवास करताना एक युवती आपली पर्स रिक्षातच विसरल्यानंतर मोबाईल व रोख रक्कमेचा समावेश असणारी ही पर्स मालवण बांगीवाडा येथील रिक्षाचालक सईद अयुब बांगी यांनी इतर मित्रमंडळींच्या सहकार्याने त्या युवतीला परत केली. रिक्षाचालक बांगी यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईस्थित मालवण…

Read More

आंबे खाण्याच्या स्पर्धेत हार्दिक, लक्ष्मण प्रथम…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.२६-: युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे कनेडी बाजारपेठ येथे रविवारी ‘एक दिवस छोट्या दोस्तांचा’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमांतर्गत आंबे खाण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात लहान गटात हार्दिक सावंत तर मोठ्या गटात लक्ष्मण हर्णे याने प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचा सविस्तर निकालपुढीलप्रमाणे आहे. या स्पर्धेत नाटळ व…

Read More

दाखल्यांसाठी युवासेनेचा पुढाकार…

⚡कणकवली ता.२६-: दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी शासकीय दाखलांची आवश्यकता असते. सदरचे दाखले तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेने पुढाकार घेणार आहे, अशी माहिती युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. युवासेनेतर्फे विद्यार्थ्यांना तहसीलदार कार्यालयात दाखले काढण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे. युवासेनेतर्फे हा सामाजिक उपक्रम…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२६-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या माध्यमातून श्री देवी माऊली घोडेमुख युवक कला क्रिडा मंडळ, न्हावेली यांच्या संकल्पनेतून मोफत भात, बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ न्हावेली पार्सेकरवाडी येथे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाळा तोंडावर आहे आणि कोकणात भात पिकाचे बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्ध करून…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२६-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या माध्यमातून श्री देवी माऊली घोडेमुख युवक कला क्रिडा मंडळ, न्हावेली यांच्या संकल्पनेतून मोफत भात, बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ न्हावेली पार्सेकरवाडी येथे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाळा तोंडावर आहे आणि कोकणात भात पिकाचे बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्ध करून…

Read More

रक्तदान करण्यास आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद वागणूक…

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार ; संबंधितावर कारवाईची देव्या सुर्याजी यांची मागणी सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद व उध्दट वागणूक दिल्याचा प्रकार रविवारी घडला. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असताना रक्तपेढीतील कर्मचारी शिष्टाचार पाळणार नसतील व रक्तदात्यांना चांगली वागणूक देत नसतील तर अशा वैद्यकीय अधिकारी वर जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ कारवाई…

Read More

माणगावात ग्रामपंचायत रस्त्यावरच अतिक्रमण करत थाटले “मंगल कार्यालय”…

ग्रामस्थांची नाराजी; वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप.. ⚡कुडाळ ता.२६-:माणगाव मळावाडी येथे असलेल्या एका व्यवसायिकांने ग्रामपंचायत रस्तावरच अतिक्रमण केल्याचा प्रकार घडला आहे.त्या ठिकाणी त्याने आपले अनधिकृतपणे मंगल कार्यालय थांटले आहेयाबाबत येथील स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन, पालकमंत्री, जिल्हाधिकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याकडे देखील तक्रार केली परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून…

Read More
You cannot copy content of this page