युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡कणकवली ता.२६-: युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे कनेडी बाजारपेठ येथे रविवारी ‘एक दिवस छोट्या दोस्तांचा’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमांतर्गत आंबे खाण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात लहान गटात हार्दिक सावंत तर मोठ्या गटात लक्ष्मण हर्णे याने प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचा सविस्तर निकालपुढीलप्रमाणे आहे. या स्पर्धेत नाटळ व हरकुळ जि. प. मतदारसंघातील 279 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.
अंगणवाडी ते इयत्ता 3 री गट : 2. प्रथमेश देसाई, 3. पराग गुरव. 4 ते 7 वी गट : 2. विघ्नेश म्हापणकर, 3. श्रेयस दारिस्तेकर. लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे 1500, 1000, 700 रु. व मोठा गटातील विजेत्यांना अनुक्रमे 2500, 2000, 1500 रु. व शैक्षणिक साहित्य बक्षीस स्वरुपात देण्यात आले. यावेळी कनेडी गटशिक्षण मंडळाचे खजिनदार तथा निवृत्त शिक्षक गणपत सावंत, युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, सुरेश सावंत, सुरेश ढवळ, विजय भोगटे, अशोक कांबळे, मंगेश बोभाटे, चंद्रसेन कांबळे, नितीन गावकर, मकरंद सावंत, राजेश सापळे, प्रफुल्ल काणेकर, महेश खांदारे, मिलिंद गावकर, धोंडी वाळके, संतोष विचारे, रमेश सापळे, मयुरी मुंज, राजश्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संदेश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमात जादूगर वैभव याने जादूचे प्रयोग व मनोरंजक खेळ करत रंगत आणली. मुलांनी जादुचे खेळ व मनोरंजक खेळांचा आनंद लुटला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची उपस्थितांनी वाहवा केली. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थिती होते.
युवा संदेश प्रतिष्ठानच्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील 15 गुणवंत विद्यार्थ्यांना इस्रो सफर घडविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. 18 जून ते 21 जून 2024 या कालावधीत हे विद्यार्थी त्रिवेंद्रम येथील इस्रो भेटीसाठी जाणार आहेत. याचा सर्व खर्च युवा संदेश प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना सावंत करणार आहेत. यावेळी सर्व मुलांना मोफत लकी ड्रॉ कुपन देण्यात आली होती. पहिल्या 10 विजेत्यांना आकर्षक शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले. याशिवाय मराठी भाषा दिनाच्या औचित्य साधून युवा संदेश प्रतिष्ठानच्या घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
