दाखल्यांसाठी युवासेनेचा पुढाकार…

⚡कणकवली ता.२६-: दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी शासकीय दाखलांची आवश्यकता असते. सदरचे दाखले तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेने पुढाकार घेणार आहे, अशी माहिती युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


युवासेनेतर्फे विद्यार्थ्यांना तहसीलदार कार्यालयात दाखले काढण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे. युवासेनेतर्फे हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, वय अधिवास, उत्पन्न दाखलासह अन्य दाखले तात्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याकरिता विद्यार्थ्यांनी गुरु मलये (9021366121) या नंबर संपर्क साधावा, असे आवाहन लोके यांनी केले आहे.

You cannot copy content of this page