माणगावात ग्रामपंचायत रस्त्यावरच अतिक्रमण करत थाटले “मंगल कार्यालय”…

ग्रामस्थांची नाराजी; वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप..

⚡कुडाळ ता.२६-:
माणगाव मळावाडी येथे असलेल्या एका व्यवसायिकांने ग्रामपंचायत रस्तावरच अतिक्रमण केल्याचा प्रकार घडला आहे.
त्या ठिकाणी त्याने आपले अनधिकृतपणे मंगल कार्यालय थांटले आहे
याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन, पालकमंत्री, जिल्हाधिकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याकडे देखील तक्रार केली परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार गेली 25 वर्षे हा रस्ता रहदारीसाठी वापरला जात आहे या रस्त्यावर डांबरीकरणासाठी शासकीय खर्च टाकण्यात आला आहे
मात्र संबंधित व्यक्तीने त्या ठिकाणी रस्ता बंद करून त्या ठिकाणी मंगल कार्यालय उभारले आहे त्यामुळे त्या ठिकाणी येतात जाताना ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले विधानसभेत देखील या संदर्भात तरांकीत प्रश्न उपस्थित केला आहे परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे या प्रकाराच्या मागे नेमके कोण असावा असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे

You cannot copy content of this page