Headlines

जलजीवन मिशनचे काम झाले मंद ; रस्त्याचे जीवन उध्वस्त झाल्याने एसटी वाहतूक झाली बंद…

⚡देवगड ता.०१-: तालुक्यातील पडवणे-पालयेवाडी येथील एसटी बस सेवा महिनाभरापासून बंद असल्यामुळे पालये येथील लोकांचे हाल झाले आहेत. जलजीवन योजनेचे काम करताना येथील रस्ता खराब झाला आहे. रस्त्याच्या कडेला गटारामध्ये खोदकाम केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे घाटी रस्ता वाहतुकीला अवघड बनला आहे. ठेकेदाराने रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन देऊन दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थानी केला…

Read More

युवा उद्योजक अचित कदम यांच्या वतीने विजवीतरण लाईनमन ना रेनकोट वाटप…

⚡कणकवली ता.०१-: वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अचित कदम यांनी कान्हा मालंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विजवीतरण च्या कणकवली ग्रामीण विभाग मधील १६ लाईनमन ना मोफत रेनकोट वाटप केले. यावेळी विजवीतरण चे अभियंता राणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता अचित कदम, कान्हा मालंडकर, सुभाष मालंडकर, इब्राहिम शेख, आनंद…

Read More

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे विद्यार्थी सत्कार समारंभ व मोफत वह्या वितरण समारंभाचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.०१-: युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मोफत वह्या वितरण समारंभाचा शुभारंभ माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे संपन्न झाला. यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने इयत्ता दहावी व बारावी या इयत्तेमधील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या एकूण १५ विद्यार्थ्यांना सुमारे ६००० किमतीचे डिजिटल वॉच देऊन युवा संदेश प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा माजी जिल्हा परिषद…

Read More

विद्यार्थांना दाखले वेळेवर देण्यात यावे…

दिपाली भालेकर: तहसीलदारांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०१-: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेबाबत व विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वेळेवर देण्यात यावे अशी मागणी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे सावंतवाडी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाकडून वय अधिवास व उत्पन्नाचा दाखला याबाबत लागणा-या कागदपत्रांची गरज असते हे दाखले तात्काळ मिळण्याबाबत…

Read More

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे…

युवराज लखमराजे भोसले: मराठा समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.. ⚡बांदा ता.०१-: विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे. ग्रामीण भागातील शिक्षण पूर्ण करुन तुम्ही पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाणार त्याठिकाणी तुम्ही गुणवत्तेत कमी पडू नये यासाठी आतापासूनच तुमच्या शिक्षणाचा दर्जा तुम्ही उंचावला पाहिजे असे मत सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी बांदा मराठा समाज…

Read More

जिल्हा बँकेची सेवा विकास संस्थेत मिळणार…

वर्धापनदिन कार्यक्रमात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे सूतोवाच.. ओरोस ता.०१-: आम्ही महिलांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यासाठी बँक सखी म्हणून नियुक्त करणार आहोत. तसेच पिग्मी एजंट आणि मायक्रो एटीएम सेवा यामुळे जिल्हा बँकेच्या वृध्दीत वेगाने वाढ होत आहे. ग्राहकांना अधिकाधिक वेगाने सेवा देण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्यात विकास संस्थांमध्ये बँकेच्या सर्व…

Read More

जिल्हा बँकेचा ४१ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा…

ओरोस ता.०१-:सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आज ४२ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त मायक्रो एटीएममध्ये सर्व बँकांचे फीचर्सचा समावेश करण्यात आला. त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, जिल्ह्यातील दहावी, बारावीतील प्रथम तीन विजेते विद्यार्थी, कर्मचारी गुणवंत पाल्य, तसेच पिग्मी एजंट यांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांनी बँकेचा ४१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील…

Read More

कृषी मेळाव्यानिमित्त फवारणी, यंत्राच्या साहाय्याने लावणी प्रात्यक्षिक…

वैभववाडी प्रतिनिधीपंचायत समिती वैभववाडी व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकिसरे महालक्ष्मी मंदिर येथे कृषी मेळावा ड्रोन कॅमेरा च्या माध्यमातून फवारणी प्रात्यक्षिक व लावणी यंत्राच्या साह्याने भात लावणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यावेळी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो यावरही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी आर डी जंगले,तालुका कृषी अधिकारी युवराज…

Read More

नाला अतिक्रमण प्रश्नी कुडाळ न.प. प्रशासनाचे चाललेय तरी काय..?

सीओ-इंजिनियर बिल्डरला पाठीशी घालताहेत का..?:मनसेच्या कुणाल किनळेकर यांचा सवाल.. ⚡कुडाळ ता.०१-: संत राऊळ महाराज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी कुडाळ नगर पंचायत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मुख्याधिकारी संबंधित बिल्डरला पाठीशी घालताहेत का असा सवाल मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, संत राऊळ…

Read More

शेतीमध्ये पारंपरिकता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घाला…

जि प. सीईओ मकरंद देशमुख यांचे आवाहन:कुडाळ मध्ये मोठ्या उत्साहात जिल्हास्तरीय कृषी दिन साजरा.. ⚡कुडाळ ता.०१-: जो शेतकरी काही प्रयोग करायला तयार आहे. जे काही करायचे ते सावधानतेने करायची त्याची तयारी आहे तो आज यशस्वी होत चाललेला आहे. पारंपरिक शेती सोबतच आधुनिक तंत्रज्ञान वापरून, उपलब्ध माहितीचा आधार घेऊन कृषी क्षेत्र समृद्ध करण्याची गरज आहे, असे…

Read More
You cannot copy content of this page