Headlines

अखेर चार तासांनी कुडाळ आगारातून एसटी बस सुरु…

नवीन वेळापत्रक लागू करण्यावरून चालक वाहक आक्रमक:ज्येष्ठ नागरीक, विद्यार्थी आणि इतर प्रवासी वेठीस… ⚡कुडाळ ता.०१-: कुडाळ एसटी आगारात आज, १ जुलै पासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. हे वेळापत्रक चुकीचे असून मनमानी पद्धतीने तयार केले असल्याचा आरोप एसटी वाहक आणि चालकांनी केला आहे. . या मनमानी कारभाराविरोधात आज दुपारी १२ वाजल्यापासून चालक आणि वाहकांनी…

Read More

नव्वद टक्के भारमान असलेली बोरीवली स्लीपर बंद…

निलेश तेंडुलकर यांनी विचारला आगार प्रमुखांना जाब.. ⚡कुडाळ ता.०१-: सिंधुदुर्ग एस टी प्रशासनाने मोठा गाजावाजा करत बांदा बोरीवली बांदा मुंबई सेंट्रल व बांदा लातूर या तीन शयनसेवा प्रवासासाठी सुरू केल्या होत्या. परंतु एक जुलैपासून भारमान मिळणार नाही असे गृहीत धरून बांदा बोरीवली कुडाळ आगाराची फेरी बंद करण्यात आली आहे. हि फेरी बंद केल्याबद्दल भाजपच्या ज्येष्ठ…

Read More

आचरा पोलीसांतर्फे नवीन कायद्याबाबत जनजागृती…

⚡मालवण ता.०१-: नवीन फौजदारी कायद्याची महिला युवक विद्यार्थी वरिष्ठ नागरिकांसह समाजातील इतर घटकांना माहिती व्हावी यासाठी आचरा पोलीस स्टेशन तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत आचरा तिठा येथे जनजागृती करण्यात आली. यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम पडवळ यांनी उपस्थितांना माहिती पत्रक देत नवीन कायद्या बाबत माहिती दिली. यावेळी आचरा…

Read More

मालवणातील आदर्श संगीत विद्यालयाची सहल संपन्न…

⚡मालवण ता.०१-: मालवण येथील आदर्श संगीत विद्यालयाची वनभोजन सहल ओझर येथील श्री ब्रह्मानंद स्वामी मठाच्या निसर्गरम्य ठिकाणी संपन्न झाली. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद लुटतानाच स्वच्छता मोहीम राबवित मठाचा परिसर स्वच्छ केला. तसेच यावेळी विद्यालयाच्या वतीने मठाच्या परिसरात सदा चुरी यांच्या हस्ते कदंब वृक्षाचे रोप लावून वृक्षारोपणही करण्यात आले. संगीत अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना निसर्गाशी देखील एकरूप…

Read More

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्र पूर्ततेसाठी कालावधी वाढवून मिळावा…

मातृत्व आधार फाउंडेशनची मागणी: तहसीलदारांना निवेदन सादर.. मालवण ता.०१-: राज्यशासनाकडून लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी शासनाने जी कागदपत्रे अर्जासोबत जोडावयास सांगितली आहेत त्यातील अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुख उत्पन्न दाखला यासारखी कागदपत्रे मिळविण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केल्यानंतर ती कागदपत्रे प्रशासनाकडून अर्जदाराला देण्याचा कालावधी हा अर्ज दाखल केल्यापासून पंधरा दिवसांचा आहे त्यामुळे या…

Read More

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सावंतवाडीच्या निता सावंत प्रथम…

⚡मालवण ता.०१-: छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह साजरा होत असून यानिमित्त सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सावंतवाडीच्या नीता सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक सानिका वायंगणकर (मालवण) व…

Read More

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अद्याप सुरूच नाही…

आम. नितेश राणे यांच्याकडून दिशाभूल:मालवणात ठाकरे शिवसेनेकडून टीका.. ⚡मालवण ता.०१-: हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत मालवण तालुक्यास दवाखाना मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात तो सुरूच झाला नसल्याचे वास्तव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आरोग्य विभागास भेट देत उघडकीस आणले. आमदार नितेश राणे यांनी हे दवाखाने सुरू असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांची…

Read More

मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांच्या घरावर सागाच्या झाडाची फांदी कोसळली…

दुपारची घटना:, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली… ⚡बांदा ता.०१-: बांदा देऊळवाडी येथे आज मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांच्या घरावर सागाच्या झाडाची फांदी कोसळली. यावेळी वीज वाहक तारा तुटून पडल्या. यावेळी परब यांचे वडील विष्णू परब हे नजिकच काम करत होते, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना आज दुपारी घडली. विष्णू परब हे आपल्या घरानजीक काम…

Read More

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी…

कणकवली तहसीलदार कार्यालयात सोमवारी मोठी गर्दी ; प्रशासनावर ताण येण्याची शक्यता.. ⚡कणकवली ता.०१-: मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे सोमवारी येथील तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र व तहसीलदार कार्यालयातील आवारात, बाजूच्या झेरॉक्स सेंटर मधून सोमवारी सकाळपासून मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पहायला मिळत होती. तर सदर…

Read More

श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे कृषी दिन साजरा

वेंगुर्ला/प्रतिनिधी:तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे 1 जुलै कृषी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 1 जुलै कृषी क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त साजरी केली जाते. छ्त्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस-ओरोस च्या विद्यार्थिनी तुळस गावातील श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे कृषि दिन साजरा केला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी तुळस गावच्या सरपंच…

Read More
You cannot copy content of this page