⚡मालवण ता.०१-: छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह साजरा होत असून यानिमित्त सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सावंतवाडीच्या नीता सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक सानिका वायंगणकर (मालवण) व राजन जाधव (वेंगुर्ला) तर तृतीय क्रमांक संजय तांबे (कणकवली) व अथर्व कोचरेकर (कणकवली) यांना विभागून देण्यात आला आहे.
या स्पर्धेचे परीक्षण डीएड कॉलेज मालवणचे प्रा. नागेश कदम यांनी केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २ जुलै रोजी सकाळी १०. ३० वाजता श्री पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी, ओरोस येथे संपन्न होणार आहे. तरी विजेत्या सर्व स्पर्धकांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी केले आहे.
