विद्यार्थांना दाखले वेळेवर देण्यात यावे…

दिपाली भालेकर: तहसीलदारांकडे केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.०१-: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेबाबत व विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वेळेवर देण्यात यावे अशी मागणी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे सावंतवाडी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाकडून वय अधिवास व उत्पन्नाचा दाखला याबाबत लागणा-या कागदपत्रांची गरज असते हे दाखले तात्काळ मिळण्याबाबत या दाखल्यांच्या कालावधी साठी शिथिलता आणण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

उत्त्पन्नाच्या दाखल्याकरिता लागणारा घरपत्रक उत्तारा व वय अधिवास काढण्याकरिता लागणारा जन्माचा दाखला १५ दिवसात मिळणे अशक्य आहे. सदर योजना ही १५ जुलै पर्यंत असल्याने उत्पन्नाचा दाखला व वय अधिवास मिळणेसाठी कमी अवधी असल्याने सदर दाखले लवकरात लवकर लाभार्थ्यांना देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.


त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की
सदर दाखले सादर करतेवेळी तहसिल कार्यालयात लाईट नसणे, डेस्कवर दाखले करण्यास अधिकारी नसणे, किंवा इंटरनेटचा प्रॉब्लेम किंवा कॉम्प्युटर नसणे अशा अनेक कारणामुळे शैक्षणिक दाखले सुध्दा वेळेवर मिळत नाहीत. तरी याबाबत आपण दाखले देणेबाबत शनिवार व रविवार दिवशी विशेष यंत्रणा राबविणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना व वरील योजनेतील महिलांना सतत हेलपाटे मारावे लागणार नाहीत, असेही त्यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे

यावळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले तृप्ती मालवणकर तैमिन तहसीलदार अंकिता सावंत ज्योती मुद्राळे योगिता आरोलकर श्रुती सावंत मेधा कशाळीकर प्रीतम भालेकर ज्योती सावंत रेखा लाखे शबीना मुजावर परविन शेख प्राप्ती राणे विद्या गोसल अश्विनी दळवी लीना देसाई स्वप्नजा सावंत सुवर्णा देसाई आदी महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page