तळवणे रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुक ठप्प…

पाऊस ओसरल्यानंतर परिस्थिती पुर्वपदावर.. ⚡सावंतवाडी ता.०७-:तालुक्यात आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले ठीक ठिकाणी नदी झाले दुथडी भरून वाहू लागले होते तर बरेच ठिकाणी भात शेती ही पाण्याखाली गेली होती तालुक्यातील बरेचसे मार्ग पुराच्या पाण्यामुळे पडले होते तळवणे येथील रस्ता ही नदीच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेल्याने या ठिकाणची दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती

Read More

तिलारी घाटात भूस्खलन…

रस्त्याचा काही भाग गेला वाहून.. ⚡दोडामार्ग ता.०७-: तिलारी घाटात मुसळधार पावसामुळे भू स्खलन होऊन डांबरी रस्त्याच्या काही भागासह डोंगराचा भागही दरीत कोसळला.सुदैवाने त्यावेळी त्या मार्गावर वाहने नसल्याने अनर्थ टळला.काही वर्षांपूर्वी असाच मुसळधार पाऊस कोसळत होता तेव्हा तिलारी घाटातील काही ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ता बंद झाला होता.यावेळीही गेले चार पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.सगळीकडे पाणीच…

Read More

मुसळधार पावसामुळे दोडामार्ग जलमय…

वाहतूक विस्कळित जनजीवन ठप्प.. ⚡दोडामार्ग ता.०७-: मुसळधार पावसामुळे तालुका जलमय झाला आहे.तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे व जनजीवन ठप्प झाले आहे.दोडामार्ग – तिलारी – वीजघर मार्गावर येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर रस्त्यात पाणी साचल्याने दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती.रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते अनेकांच्या घरात रस्त्यावरील पाणी पोचले होते. याच मार्गावरील…

Read More

जर्मनी सारख्या देशात कौशल्याला खुप वाव आहे,आपली मुलं कौशल्यात कुठेही कमी नाहीत…

मंत्री दिपक केसरकर:जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचं केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ… ⚡सावंतवाडी ता.०७-: आई-वडीलांनी कर्ज घेऊन शिकवलं त्याची भरपाई आपण केली पाहिजे. जर्मनी सारख्या देशात कौशल्याला खुप वाव आहे. आपली मुलं कौशल्यात कुठेही कमी नाहीत. त्यामुळे या संधीचा आपल्या भागातील मुलांनी लाभ घ्यावा. नरेंद्र मोदी यांनी स्कील डेव्हलपमेंटची मुहुर्तमेढ रोवली. त्याचा फायदा आता होत आहे‌. राज्य…

Read More

कणकवली तालुक्याला पावसाने झोडपले…

वागदे मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्यावर पाणी.. ⚡कणकवली ता.०७-: गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कणकवली तालुक्‍यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी घेतलेल्या नोंदीत ५९ मिमी इतकी नोंद झाली आहे. तर तालुक्यातील मराठा मंडळनजिक, वागदे येथील केटी बंधाऱ्यावरून पाणी…

Read More

राजन तेलींची भाजपातून हकालपट्टी करा..

मंत्री केसरकर: वरिष्ठांकडे करणार मागणी सावंतवाडी : राजन तेली यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व काय आहे ? एखाद्या मतदारसंघाचा आमदार व्हायचं म्हणून पातळी सोडून टीका ते करत आहेत. तेली यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मी करणार आहे. खालच्या पातळीवर जाऊन बोलायची पण एक मर्यादा असते. मला बोलायचं झालं तर मी खुप काही बोलू शकतो. पण, महायुतीचा…

Read More

वेंगुर्ला भाजपच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण‘ योजनेचे मोफत फॉर्म वितरण…

⚡वेंगुर्ला ता.०७-: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण‘ योजना समाजातील शेवटच्या महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून मोफत फॉर्म वितरीत करण्यात येत आहे. ही योजना वेंगुर्ला तालुक्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी गावागावात भाजपातर्फे कॅम्प घेऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी सांगीतले. भाजपा वेंगुर्ला तालुका कार्यालयात ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण‘ योजनेचे मोफत…

Read More

जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा…

मंत्री दिपक केसरकर:पत्रकार पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा कार्यक्रम उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आद्यापत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक होताना मी अर्थ खात्याच्या मंत्री होतो. नुकतच राज्य सरकारने पुस्तकांच गाव म्हणून बाळशास्त्रींच पोंभुर्ले गाव घोषित केलं‌ आहे. पत्रकारांच्या सुख दुःखात आपण नेहमीच सहभागी होत असतो. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा आहे‌ असं प्रतिपादन शालेय…

Read More

होडावडा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प…

वेंगुर्ले :वेंगुर्ले – सावंतवाडी मार्गावरील होडावडा येथील फुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच नदीचे पाणी भात शेतीमध्ये घुसल्याने शेतीही पाण्याखाली गेली आहे. होडावडा येथील हे नदीवरील पूल रस्त्याच्या बरोबर सखल भागात असल्याने दरवर्षी मोठा पाऊस झाला की या पुलावर पाणी येते. आणि वाहतूक ठप्प होते….

Read More

नरेद्र डोंगर येथे झाड कोसळून खासगी कर्मचारी जखमी..

⚡सावंतवाडी ता.०७-: सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नरेंद्र डोंगर येथे वन विभाग कर्मचारी ड्युटी बजावत असताना चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.ही घटना दुपारी एकच्या दरम्यान घडली.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली आहे. दरम्यान आपला सहकारी अशोक गावडे यांना फोन करून सदर घटनेची कल्पना दिली असता अशोक गावडे तेथे…

Read More
You cannot copy content of this page