अतिवृष्टीमध्ये जामसंडे खाकशी वाडी येथे कोसळली पाऊलवाटेची संरक्षक भिंत…

कोसळल्या संरक्षण भिंतीचे चिरे पेडणेकर यांच्या अंगणामध्ये.. ⚡देवगड ता.०८-: देवगड तालुक्यात रविवार व सोमवारी पावसाने धुवाधार बॅटिंग केली आहे त्या ठिकाणी यामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन वाहतुकीचा खोळंबा देखील झाला आहे. सोमवारी पहाटे तर पावसाने हाहाकारच माजविला ठिकठिकाणी रस्ते,मळेशेती माड बागायची पाण्याखाली गेल्या होत्या.देवगड तालुक्यातील जामसंडे खाकशीवाडी येथील विलास पेडणेकर यांच्या घरासमोरील चिरेबंदी घाटीची दरड कोसळून…

Read More

बाजारपेठेतील नाले त्वरित साफ करून घ्या…

राजू बेग: नगरपरिषदेकडे निवेदनद्वारे केली मागणी.. सावंतवाडी ता.०८-: बाजारपेठेतील नाले साफ न केल्याने काल संपूर्ण बाजारपेठेत पाणी आले त्यामुळे तात्काळ नगरपालिकेने नाले साफ करून घ्यावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी केली आहे. दरम्यान शहरातील मुख्य नाला विसावा हॉटेल ते मच्छी मार्केट पर्यंत बंदिस्त केलेले आहेत, गेले वीस वर्षे साफसफाई न झाल्याने अनेक बाटल्या…

Read More

शासकीय विश्रामगृहाला १० कोटी केले खर्च…

पहिल्याच पावसात लागली गळती:आमदार वैभव नाईक यांच्याकडून कणकवली येथील विश्रामगृहाच्या कामाचा पोलखोल.. ⚡कणकवली ता.०८-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कणकवली मधील नव्याने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्या पावसामध्ये गळती लागली आहे. दोन महिन्यां पूर्वी या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या विश्रामगृहाची अवस्था…

Read More

पुणे येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी अमित गंगावणे यांची पंचपदी नियुक्ती…

⚡वैभववाडी ता.०८-: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने 71 वी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2024 पुणे येथे होणा-या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य पंच श्री.अमित गंगावणे यांची पंचपदी नियुक्ती*

Read More

वाहून गेलेल्या गाडीतील तिघांना वाचवण्यात यश…

काळ आला होता पण…;साटेली भेडशीतील घटना… दोडामार्ग (वा.)साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील पुलावरील पाण्यातूनवाहून गेलेल्या चारचाकी वाहनातील तिघांना वाचविण्यात अखेर यश आले.काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच या घटनेला म्हणावे लागेल.स्थानिक ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे ते तिघेही वाचले.तिघेही जण कणकवली येथील असून ते साटेली भेडशी येथे मित्राकडे आले होते. सुहास परब, प्रसाद क्षीरसागर व…

Read More

बांदा शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी घुसल…

⚡बांदा ता.०७-: मुसळधार पावसाने तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरातील मुख्य बाजारपेठेत घुसले. गांधीचौक व उभाबाजारातील व्यापाऱ्यांची अंधारात सामान सुरक्षितस्थळी हलवीताना तारांबळ उडाली. तर आळवाडी बाजारपेठेतील पाण्याची पातळी देखील वाढली असून पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी तसेच स्थानिक चिंतेत आहेत.

Read More

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा.. सावंतवाडी प्रतिनिधीरविवारी ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आठ जुलै सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहेयाबाबतची घोषणा त्यानी सावंतवाडी येथे एका कार्यक्रमादरम्यान केली अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले…

Read More

” शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , क्रिडा क्षेत्रातील अनमोल हिरा हरपला.”…

पेंडूर येथील शोकसभेत संजय नाईक सरांना श्रध्दांजली वाहताना अनेकांना अश्रू अनावर.. ⚡मालवण ता.०७-: कोरोनाशी झुंज देऊन संजय नाईक सर पुन्हा उभे राहिले होते पण यावेळी काळाने डाव साधला. नेतृत्व , कर्तृत्व , वक्तृत्व आणि दातृत्व या गुणांमुळे सरांनी नावलौकिक मिळवला होता. शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक चळवळीत सर नेहमीच पुढे असायचे. त्यांच्या सारखा कुटुंबवत्सल आणि…

Read More

घोणसरी येथे घरावर कोसळले आंब्याचे झाड ; मोठे नुकसान…

⚡कणकवली ता.०७-: तालुक्यातील फोंडाघाट येथे मुसळधार झालेल्या पावसाचा फटका घोणसरी गावातील आयरेवाडी येथील पांडुरंग जाधव यांच्या घरावर झाड पडुन नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घोणसरी आयरेवाडी येथील पांडुरंग वसंत जाधव यांच्या घरावर रविवारी झालेल्या मुसळधार पावसामूळे सायंकाळी ५ वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आंब्याचे झाड कोसळले. यात जाधव यांच्या घराच्या छप्पराचे मोठे नुकसान…

Read More

समाजातील लोकांनाही सरकारचा एक मंत्री आणि आमदार म्हणून सदैव मदत करेन

मंत्री दिपक केसरकर:वैश्य समाजातील गुणवंतांचा केला सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: वैश्य समाजाचा वारसा नवी पिढी पुढे घेऊन जात आहे याचा आनंद आहे. माझं प्रेम सावंतवाडीवर अधिक आहे. समाजातील कुठल्याही बांधवाला गरज असेल त्यावेळी मला हाक मारा, तुम्हाला निश्चित सहकार्य करेन. पुण्श्लोक बापुसाहेब महाराजांनी दिलेल्या शिकवणीनुसार इतर समाजातील लोकांनाही सरकारचा एक मंत्री आणि आमदार म्हणून सदैव मदत…

Read More
You cannot copy content of this page