आमदार वैभव नाईक यांनी घेतले आरोंदा येथील निवासस्थानी स्थापित बाप्पाचे दर्शन…!

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. सर्व गणेशभक्तांच्या सुखसमृद्धीची कामना त्यांनी गणपती बाप्पांकडे केली.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, मुलगी नंदिनी नाईक, भाऊ सतीश नाईक व कुटुंबीय, श्री सुशांत नाईक व कुटुंबीय, तसेच श्री संकेत नाईक व कुटुंबीय यांच्यासहित परिवारातील सर्वांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी नाईक कुटुंबियांकडून सर्व गणेशभक्तांना सदृढ आरोग्य, व सुख समाधान प्राप्त होण्यासाठी गणरायाकडे साकडे घातले.

You cannot copy content of this page