भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग गुरुवार पासून छेडणार बेमुदत उपोषण
सावंतवाडी दि – ०८:- अक्षय जर्नादन साईल याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यास पोलिस अपयशी ठरल्याने पोलिस निरीक्षक सावंतवाडी यांच्या कार्यालया समोर भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग गुरुवार १२ सप्टेंबर पासून बेमूदत उपोषणास छेडणार आहेत.
दरम्यान कोलगाव भोम वाडी येथील अक्षय जनार्दन साहिल यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी याबाबतचे निवेदन देऊन पाच दिवस उलटले तरी दोन संशयीत सोडून व्यतिरिक्त आरोपींना अद्याप पर्यंत अटक करण्यात आलेली नाही ,संशयित आरोपींचे फोन नंबर ,त्यांचे लोकेशन, पोलीस अद्याप पर्यंत मिळवण्यात अपयशी ठरले आहे ,संबंधित आरोपी हे अवैध धंद्याशी निगडित असल्याने त्यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरत ठरत असल्याने महेश सारंग पोलीस प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार आहेत
