वेंगुर्ल्यातील ४६ भजन मंडळांना साहित्य संचाची भेट…
भाजपा नेते संदिप गावडे यांचा उपक्रम.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: भाजप हा आध्यात्मिक गोष्टींशी निगडीत आहे. त्यामुळे पंतप्रधानांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वच नेते धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात. म्हणून पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आपण स्वखर्चाने भजन साहित्य देत असल्याचे प्रतिपादन भाजपाच नेते संदिप गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.
