बांदा प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेले स्वागत कक्ष…

पत्रा देवी बांदा प्रवेश द्वारावर हा.बा.विभागाचे गणेश भक्तांसाठी स्वागत कक्ष..

सावंतवाडी ता.०६-: महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या हद्दीवर असलेल्या गोवा पत्रा देवी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गणेश भक्तांचे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहे मुंबई पुणे गोवा या मार्गातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल होणाऱ्या साखरमानांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्वागत गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून करण्यात येणार आहे यावेळी सावंतवाडी बांधकाम विभागाच्या विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांच्यासह शाखा अभियंता विजय चव्हाण आदीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली आहे या सुविधा कक्षामध्ये पाच कक्ष उभारण्यात आले आहे यामध्ये चहापान विश्रांती कक्ष हिरकणी कक्ष शौचालयाची सुविधा असून आरोग्य सुविधा कक्ष पोलीस वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पत्रादेवी बांदा यादरम्यान हे कक्ष उभारण्यात आले असून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे या कक्षामध्ये स्वागत केले जाणार आहे त्यानंतर चहापानानंतर त्यांना पुढे मार्गस्थ केले जाणार आहे यादरम्यान त्यांना अन्य सुविधा ही प्रधान करण्यात आले आहेत या कक्षाचे उद्घाटन गणेश चतुर्थी दिवशी सकाळी होणार असून गणेश भक्ताने याचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी केले आहे

You cannot copy content of this page