59 पैकी 26 पदे रिक्त:शिवसेनेचे रुपेश पावसकर यांची मागणी..
⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील तलाठ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
तालुक्यात एकूण ५९ तलाठी सजा आहेत. त्यातील २६ तलाठी सजा पदे रिक्त आहेत. तलाठी सजा तात्काळ भरल्यास लोकांची गैरसोय होणार नाही. शिवाय नियुक्त असलेले ३३ तलाठी यांच्यावर अतिरिक्त कार्यभार दिल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात ओढाताण होताना दिसून येते, त्यामुळे लोकांची कामे अपूर्ण राहतात, त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास होत आहे. तरी आपल्या स्तरावरून रिक्त तलाठी सजा पदे तात्काळ भरून लोकांची होणारी गैरसोय दूर व्हावी व लोकांना न्याय द्यावा अशी विनंती श्री पावसकर यांनी केली आहे.
