सावंतवाडी मतदार संघातील रस्त्याची झालेली काम ही निष्कृष्ट दर्जाची…

परशुराम उपरकर यांचा आरोप: पावसात सुरू असलेली काम तात्काळ थांबा…

सावंतवाडी ता.०५ सावंतवाडी मतदारसंघातील रस्त्याची झालेली काम ही निकृष्ट दर्जाचे असून बऱ्याच ठिकाणी रस्त्या उकडला असून त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून सदर रस्त्याचे काम दर्जाचे व्हावे. व ते पावसाळ्यानंतर योग्य पद्धतीने त्याचे काम व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी कार्यकारी अभियंता श्री. किणी यांच्याकडे केली.

दरम्यान शिरोडा बायपास रस्ता व वेंगुर्ला आरवली शिरोडा रस्ता पावसाळ्या दरम्यान काम सुरू असल्याचे देखील श्री.उपरकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.श्री. उपरकर यांनी आज सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेत मतदार संघातील विविध समस्यांबाबत लक्ष वेधले.

ते पुढे म्हणाले की पावसाळ्यात ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे सुरू आहेत. ती कामे तात्काळ थांबवून पावसाळ्यानंतर चांगल्या दर्जाने त्याची काम व्हावी व ती कामे योग्य पद्धतीने टिकावी असे. श्री. उपरकर यांनी कार्यकारी अभियंता यांना सांगितले. तर पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असलेली कामे तात्काळ थांबवून पावसाळ्यानंतर योग्य दर्जाची करणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता श्री. किणी यांनी माजी आमदार श्री उपरकर यांना दिला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, आबा चिपकर, संतोष सावंत, शुभम सावंत , नाना सावंत, बाळा बहिरे , आदेश सावंत आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page