पाट हायस्कूलमध्ये कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड…

⚡कुडाळ ता.०५-: एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय, कै.एस.आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला,वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालय व इंग्लिश मीडियम विद्यालयामध्ये वन अधिकारी नेहा मुरकुटे व सुनील सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनादिवशी वृक्ष लागवड करण्यात आली.


अमृत महोत्सवानिमित्त “अमृतवृक्ष आपल्या दारी” अशी वनमहोत्सवाची संकल्पना आहे, असे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नेहा मुरकुटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. पर्यावरणाला आपल्या आयुष्यात सामावून घेतले पाहिजे. प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे ,असा संदेश वन अधिकारी सुनील सावंत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, सर्व विषयांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत. पाठांतर व आकलन महत्त्वाचे असते. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर अभ्यास करा, असा मौलिक संदेश स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करताना नेहा मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
व्यासपीठावर नेहा मुरकुटे, सुनील सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, शिक्षक प्रतिनिधी तानाजी काळे, संदीप साळसकर उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप साळसकर व आभार पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी मानले.

You cannot copy content of this page