वसुंधरा विज्ञान नेरूरपार येथे 7 रोजी रंगभरण स्पर्धेचे आयोजन…

कुडाळ : श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल आणि प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांच्या वतीने रविवार दिनांक 7 जुलै रोजी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे सकाळी दहा वाजता ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. इयत्ता पहिली ते चौथी पहिला गट, इयत्ता पाचवी ते सातवी दुसरा गट आणि इयत्ता आठवी ते दहावी तिसरा गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. श्रीमती मनोरमा महादेव चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुलांचे आरोग्य तपासणी होणार आहे. यामध्ये दात आणि डोळे यांचे डॉक्टर विशेष मार्गदर्शन करतील. त्यामुळे या संधीचा हे लाभ घ्यावा. श्रीमती मनोरमा महादेव चौधरी ट्रस्टर्फे दरवर्षी मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीही कलागुणांना वाव अध्यक्ष दयानंद चौधरी यानी केले आहे. तसेच कला विषयाचे विशेष मार्गदर्शन मिळण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन संस्था सचिव संदीप साळसकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page