हळवलमधील हानीची खा. राऊतांकडून पाहणी…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा हळवल गावाला तडाखा बसला होता. या पावसामुळे अनेकांचा घरांची पडझड झाली होती. या हानीची खासदार विनायक राऊत यांनी पाहणी केली.


यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, माधवी दळवी, ग्रा. पं. सदस्य रोहित राणे, अनंत राणे, विजय परब, कमलाकर तांबे, आप्पा ठाकूर, श्री. परब आदी उपस्थित होते. राऊत यांनी हानीची पाहणी केल्यानंतर अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासोबत शासकीय मदतीबाबत चर्चा केली. पावसामुळे झालेल्या हानीची माहिती रोहित राणे यांनी विनायक राऊत यांना दिली. वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार गावात घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page