अबीद नाईक: राणेंनी असलेली लोकप्रियता पाहता, त्यांचा फारसा प्रचार करावा लागणार नाही…
⚡कणकवली ता.१८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना अडीच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. मंत्री उदय सामंत यांनी राणेंच्या उमेदवारीला आपला पाठिंबा देऊन सामंजस्याची भूमिका घेतली, याबाबत मी त्यांचे आभार मानतो, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला बॅ. नाथ पै, मधु दंडवेत यांच्या नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. नारायण राणे हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांना महायुतीकडून या मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंनी असलेली लोकप्रियता पाहता, त्यांचा फारसा प्रचार करावा लागणार नाही. मात्र, त्यांना अडीच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
