खरेदी विक्री संघाला वेळेत खतपुरवठा करावा…

जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्या सूचना ः वागदेत खरीब हंगाम आढावा बैठक..

⚡कणकवली ता.१७-: शासनाच्या धोरणानुसार सर्व विकास संस्थांनी खत विक्री लायसन व पॉज मशीनवर खत विक्री केली पाहिजे. मात्र, लायसन्ससाठी बीएसी प्रतिनिधी आवश्यक ही अट सोसायट्यांना ठेवणे शक्य नाही. तरी देखील ज्या संस्थाना शक्य आहे. त्यांनी लायसन्स अपडेट करावीत. खतपुरवठा संबंधित कंपन्यांनी वेळेत शेतकरी खरेदी विक्री संघाला करावा तरच गावागावांत शेतकर्‍यांपर्यंत लवकरात लवकर खतपुरवठा करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांनी दिला यांनी दिला.


वागदे येथील हॉटेल विश्रांती येथे रविवारी कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमन व गटसचिव खरीब हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश सावंत, व्हा.चेअरमन सुरेश ढवळ, सिंधुदुर्ग गुणवत्ता निरीक्षक संभाजी शेंनवे, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, संचालक संजय शिरसाट, विनिता बुचडे, प्रशांत सावंत,रघुनाथ राणे, पंढरी वायगणकर,अतुल दळवी,लीना परब,स्मिता पावसकर आदी संचालक व तालुक्यातील संस्था चेअरमन व सचिव उपस्थित आहे.
शेतकर्‍यांनी मागणी पाहून खत मागणी करा, असे प्रकाश सावंत यांनी सांगितले. पाऊस वेळेवर होईल, त्यानुसार नियोजन आवश्यक आहे. भात बियाणे विक्री करण्यापूर्वी स्वतः टेस्ट करा. सेंद्रिय शेती,नैसर्गिक शेती करण्याची गरज असल्याचे वैशाली मुळे यांनी सांगितले.
संभाजी शेनवे म्हणाले, हवामानाचा अंदाज घेवून खरीब पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे, असे संभाजी शेनवे यांनी सांगितले. संघाचे सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र सावंत, कविता राणे, संदीप तोरस्कर वाळवे, सायली लाडगांवकर इकाळे, करुणा घाडीगावकर, किशोर राऊत उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघाचे व्यवस्थापक गणेश तावडे यांनी केले.

You cannot copy content of this page