⚡कणकवली ता.१७-: हनुमान जयंतीनिमित्त जय हनुमान युवा मित्रमंडळातर्फे सोमवार 22 एप्रिलला सकाळी 9.30 ते दुपारी 1 यावेळेत कलमठ-मोरेश्वरनगर येथील श्री हनुमान मंदिर याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अमेय मडव (9619326057), निखिल नाईक, अक्षय विखाळे यांच्याकडे संपर्क साधावा.
कलमठमध्ये 22 एप्रिलला रक्तदान शिबीर…
