मे महिन्यापासून प्रत्येक रविवारी सुरु होणार मोफत मार्गदर्शन वर्ग..
सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजातर्फे दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून दहावी-बारावीनंतर पुढे काय? कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत, याबाबतचे मोफत मार्गदर्शन तसेच यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन में महिन्या पासून प्रत्येक रविवारी ठेवण्यात येणार आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी ८४८४८२७९९३ या व्हॉट्सअॅप नंबरवर आपले नाव, गाव व इयत्ता लिहून संदेश टाकावा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
नुकत्याच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत.
आता पुढे काय, असा प्रश्न प्रत्येक पालकाच्या विद्यार्थ्यांच्या मनात असतो. कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध असतात, त्यासाठी काय केले पाहिजे, सीताराम गावडे याबाबतचे अचूक मार्गदर्शन असणे गरजेचे आहे. बऱ्याचवेळा पालक आपली मते विद्यार्थ्यांवर लादतात. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांचेही नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय आहे, त्याला काय बनायचे आहे? त्यासाठी तो सक्षम आहे का? याबाबतची सर्व चाचणी करून त्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन मोफत करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्याबरोबर पालकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन केले आहे.
