मालवणी एकांकिकेच्या अंतिम फेरीसाठी जापसाल, वाॅरंटची निवड …

⚡कणकवली ता,१७-: आम्ही मालवणी प्रस्तुत मालवणी एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी शिवाजीनगर येथील सुहास वरुणकर यांच्या निवासस्थानी पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी श्री गणेश कलामंच, कणकवलीची ‘जापसाल’, अमर जवान क्रिएशन, नेतर्डेची ‘वॉरंट’ या एकांकिकेची निवड झाली.


प्राथमिक फेरीत नवरत्न कोकण परिवार प्रतिष्ठानची ‘जांभूळनात’, अमर जवान क्रिएशन, नेतर्डेचे एकांकिका ‘वॉरंट’, श्री गणेश कलामंच, कणकवलीची ‘जापसाल’, चंद्रभागा प्रोेडक्शन कणकवली ‘नटीचा काय’, जिल्हा परिषद शाळा ओसरगाव नं. 1 ‘आये’, अक्षरसिंधु साहित्यमंच कणकवली ‘शबय’ या एकांकिका सादर झाल्या. परीक्षक ज्येष्ठ रंगकर्मी संभाजी सावंत, गणेश रेवडेकर यांनी केले.
स्पर्धेची प्राथमिक फेरी पाहण्यासाठी आम्ही मालवणी समूहाचे विठ्ठल सावंत ज्येष्ठ नाटककार संभाजी सावंत, सिने अभिनेते गणेश रेडकर, प्रदीप तोंडवळकर, सतेज दळवी वस्त्राहरणकार गंगाराम गवाणकर, सुहास वरुणकर आदी उपस्थित होते. यावेळी सुहास वरुणकर, विठ्ठल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवार 21 एप्रिलला भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर लघु नाट्यगृह, मिरारोड येथे होणार आहे.

You cannot copy content of this page