आंबोलीत राम जन्मोत्सव उत्साहात साजरा…

आंबोली,ता.१७: येथील राघवेश्वर येथे राम मंदिर येथे राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. तसेच बाजारवाडी येथील राम मंदिर येथेही जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथील दोन्ही राम मंदिरात उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

राघवेश्वर मठ येथे आंबोलीतील ग्रामस्थासह कोल्हापूर,आजरा,बेळगाव,पश्चिम महाराष्ट्रातील भक्तगण उपस्थित होते. प.पू. भारतदास महाराज मठात दर शनिवारी सत्यनारायण महापूजा असते. पश्चिम महाराष्ट्रातील भक्तगण मोठ्या प्रमाणात उत्सवासाठी येथे येतात.आज राम जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.

You cannot copy content of this page