राजन कोरगावकर यांचे आवाहन ः शिक्षक समितीचा कट्टा येथील गुणगौरव सोहळा उत्साहात..
⚡कणकवली ता.१७-: शिक्षकांनी आपला आत्मसन्मान जागृत ठेवून आपले कार्य सचोटीने केले पाहिजे. कोणत्याही चुकीच्या आदेशाला शिक्षकांनी बळी न पडता ज्ञानदानाचे कार्य अविरत चालू ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण शाखेचा वार्षिक गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय येथे आयोजित केला होता. या प्रसंगी श्री. कोरगावकर बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, तालुकाध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, विस्तार अधिकारी उदय दीक्षित,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर,ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण,चंद्रकांत अणावकर, शिक्षक नेत्या सुरेखा कदम,शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष नारायण नाईक,उपाध्यक्ष संतोष राणे,महिला जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर,सरचिटणीस वैभवी कसालकर, जिल्हा सल्लागार नितीन कदम, पतपेढी संचालक विजय सावंत,चंद्रसेन पाताडे, मंगेश कांबळी,संतोष मोरे,श्रीकृष्ण कांबळी,सीताराम लांबर,जिल्हा उपाध्यक्ष रुपेश गरुड,तालुका सचिव जीवन हजारे,प्रवक्ता नवनाथ भोळे,तालुका महिला आघाडी अध्यक्षा नेहा तांबे,सचिव भाग्यश्री वाडकर,केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत,देऊ जंगले,माजी अध्यक्ष सुयोग धामापूरकर,कणकवली तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर,जिल्हा प्रसिद्धिप्रमुख विनायक जाधव,वैभववाडी तालुकाध्यक्ष रफिक बोबडे,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सीताराम नाईक,दोडामार्ग सचिव प्रशांत झालबा, जिल्हा पदाधिकारी कालिदास खानोलकर,सुगंध तांबे,प्रशांत दळवी,प्रकाश बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत अणावकर, विठ्ठल गवस, नारायण नाईक, सुरेखा कदम, उदय दीक्षित ,राजेंद्रप्रसाद गाड यांनी मार्गदर्शन केले
शिष्यवृत्ती सराव परीक्षेत यशस्वी विद्यार्थी, श्रीकृष्ण सावंत पुरस्कृत ऑनलाइन कथाकथन स्पर्धेतील यशवंत ३५ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र ट्रॉफी व बुद्धिबळ सेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मालवण तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जीवन हजारे यांनी केले. सूत्रसंचालन वैभवी कसालकर यांनी केले. आभार चंद्रसेन पाताडे यांनी मानले. यावेळी शिक्षक समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
