रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी…

सतीश आचरेकर:या निवडणुकीसाठी नवीन चेहरा हवा अशी सर्वसामान्यांची इच्छा..

⚡मालवण ता.१४-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतून किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी, त्यांना धनुष्यबाण हीच निशाणी मिळावी, अशी आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. सामंत यांना उमेदवारी मिळाल्यास साडे तीन लाखाच्या मताधिक्क्याने त्यांचा विजय होईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते सतीश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मालवण बंदर जेटी येथे सतीश आचरेकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सतीश आचरेकर यांच्या सह दिलीप आचरेकर, शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवती सेना तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, कमलाकांत पारकर, अरुण तोडणकर, बाळू नाटेकर, प्रियांका मेस्त्री, दाजीबा कुबल, किसन मांजरेकर, एजाज मुल्ला, नदीम मुजावर, बाबा जोशी, वैभव मयेकर, अनमोल आढाव, रोहन आचरेकर, तुषार मसुरकर, राज जाधव, आनंद आचरेकर, विनय हरमलकर, संजय नार्वेकर, रोहित जोशी, मॉन्टी तारी, बाबू तोडणकर, मारुती भाबल, प्रमोद जोशी, बाबा मुकादम, नऊमहंमद मुजावर, हरेश ढवळे, गुणेश हडकर, मंदार कांदळकर, सागर भोगवेकर, राहुल भिसे, प्रणय कांबळी, रोहित कवटकर, सचिन लोके, कुणाल मालवणकर, संजय आढाव, प्रथमेश आढाव, प्रताप आढाव, प्रणय वाघ, दर्पण सादये, निखिल मेस्त्री, जॉन्टी फर्नाडिस, विशाल निकम, सुशांत कोचरेकर, बबन कुबल, आदित्य कुमठेकर, गणेश घोगले, तुषार मिसाळ, महेश शिंदे, शैलेश मलये, शशांक धुरी, सिल्व्हीस्टर फर्नांडिस, सिद्धेश केळुसकर, सुरज लोणे, पराग परब यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सतीश आचरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भैया सामंत आगे बढो हम तुम्हारे साथ है, हर घर मै एकही नारा, किरण सामंत खासदार हमारा अशा जोरदार घोषणा दिल्या.

सतीश आचरेकर म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर किरण सामंत यांची उमेदवारी जाहीर व्हावी. ही निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावरच व्हावी, कारण हे चिन्ह घरोघरी पोहचलेले आहे. किरण सामंत यांची काम करण्याची जशी पद्धत रत्नागिरीत आहे तशीच ती सिंधुदुर्गातही आहे. हे येथील युवा पिढीच्या उपस्थिती वरून दिसून येते. या निवडणुकीसाठी नवीन चेहरा हवा अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. किरण सामंत हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. सर्वसामान्यांसाठी ते केव्हाही उपलब्ध असतात. त्यांचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले आहेत. ज्याला आपण निवडून देऊ त्या नेत्याने स्थानिक पातळीवर येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा असते आणि हे काम किरण सामंत यांच्या माध्यमातूनच होऊ शकते. त्यामुळे किरण सामंत या मतदार संघातून निवडून आल्यास येथील विकासात भर पडेल. युवक, व्यावसायिक, सुशिक्षित नागरिक असतील, बेरोजगार असतील. तर त्यांना येथे प्रकल्प आले पाहिजेत, उद्योगधंदे वाढले पाहिजेत अशी सर्वांची भावना आहे. जेणेकरून सर्वसामान्यांचे भविष्य उज्ज्वल होईल असे श्री. आचरेकर यांनी स्पष्ट केले.

लोकसंभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. कारण ठाकरे शिवसेनेचे उमेदवार हे फक्त निवडणुकीच्या काळातच दिसून येतात. अन्य काळात ते गायब असल्याने अशा उमेदवाराला मत घालायचे कसे असा प्रश्न मतदारांना पडला आहे. त्यामुळे या मतदार संघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळाल्यास रत्नागिरी जिल्हाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही त्यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ, असा आम्हाला विश्वास आहे, असेही सतीश आचरेकर म्हणाले.

तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून उमेदवारीसाठी जसे भाजपमधून नारायण राणे आग्रही आहेत. तसेच शिवसेनेमधून किरण सामंत हे आग्रही आहेत. आमच्या पक्षाला जर तिकीट मिळाले तर आम्ही साडे तीन लाखाच्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकू. जर महायुतीतून भाजपला उमेदवारी मिळाली तर वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करू, असेही आचरेकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page