मला नुसतं जिंकायचं नाही तर अडीच लाखांच मताधिक्य हवं…

केंद्रीय मंत्री नारायण राणे:महायुतीच्या उमेदवाराला.. निवडून द्यावं..

⚡सावंतवाडी ता.१४-: लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या असं सांगायला सावंतवाडीत आलो आहे. मला नुसतं जिंकायचं नाही तर अडीच लाखांच मताधिक्य हवं आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा व मोदींच ४०० पारच स्वप्न साकार करताना तुमच्या हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवा असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. माजगाव येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजगाव येथील महायुतीच्या सभेत केल. मी गेली ३४ वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे‌. ९० सालात कणकवली मालवणमधून आमदार झालो. पुढे मंत्री, मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेता ते केंद्रीय मंत्री अशी पद मला प्राप्त झाली. या पदांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट कसा होईल याकडे कायम लक्ष दिलं. रस्ते, वीज, पाणी आदी प्रश्न पुर्णपणे सोडविले. सिंधुदुर्गची परिस्थिती बदलायची असा निर्धार केला.

याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, अशोक दळवी, श्वेता कोरगावकर, मनिष दळवी, संजू परब, संदीप कुडतरकर, महेश सारंग, नारायण उर्फ बबन राणे, रेश्मा सावंत, डॉ. अर्चना सावंत आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page