केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची राजन तेलींना समज: आपल्याला महायुतीचा उमेदवार विजयी करायचा…
⚡सावंतवाडी ता.१४-: राजन परत असं करू नकोस आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे त्यामुळे एक दिलाने काम करा अशी समज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजन तेली यांना दिली.
राजन तेली यांच्या नाराजीच्या स्टेटस बाबत आज मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी नारायण राणे यांनी चांगल्या कार्यात अपशकुन नको आपण पक्षहीत जपतो अशा कानपिचक्या देत आपण तेलींशी प्रत्यक्ष बोलेन असे सांगितले होते त्यानंतर माजगाव येथे झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्यांनी राजन तेली यांची समाज काढून आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे असे सांगितले.
