आंबोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात…

आंबोली,ता.१४: येथील रमाईनगर येथे भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आंबोली रमाईनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमाचे दीप प्रज्योलन सरपंच सौ.सावित्री पालेकर,डॉ.आदिती पाटकर,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,प्रकाश गुरव,संतोष पालेकर,बाळकृष्ण गावडे,राजाराम सावंत, मनोहर जाधव,रोहिणी गुरव,कार्यक्रम अध्यक्ष शिक्षक दत्ताराम जाधव,केशव जाधव,सावित्री जाधव,रंजना जाधव,सौ.सीमा गावडे,प्रकाश उर्फ नाना जाधव,अनिल चव्हाण यांनी दिपप्रज्योलन केले. तसेच मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,सावित्री फुले,गौतम बुद्ध,क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक अध्यक्ष आत्माराम गावडे,दिलीप राऊत,बाबू चव्हाण उपस्थित होते. यावेळी डॉ.बाबासाहेबांना वंदन करण्यात आले.मुलींनी मानवंदना दिल्यानंतर महिलांनी भीमगीत सादर केले.यावेळी विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडी तालुकास्तरीय समूहगीतगायन स्पर्धत तृतीय क्रमांक आलेल्या येथील क्रांतीज्योती महिला समूहाला सरपंच व मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.सरपंच तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विजय जाधव, राकेश अमृस्कर,प्रथमेश गावडे, शंकर गावडे, गोविंद जाधव,दशरथ जाधव,प्रसाद जाधव,अजय जाधव,स्वप्नील जाधव,सतीश जाधव, कला क्रीडा मंडळ कार्यकर्ते तसेचअर्जुन जाधव,ज्ञानेश्वर जाधव,बाळकृष्ण जाधव,शैलेश जाधव,सखाराम जाधव,विजय जाधव,लक्ष्मण जाधव,प्रदीप पेंडसे,आंबोली आरोग्य पर्यवेक्षिका सौ.साक्षी जाधव,सुनील जाधव,दशरथ जाधव,भिकाजी मातोंडकर,भाऊ चव्हाण,यशवंत जाधव,एकनाथ जाधव,संतोष जाधव,पांडुरंग जाधव सर्व महिला वर्ग उपस्थित होते.दुपारनंतर आंबोली बाजारवाडी येथे रॅली काढण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page