⚡कणकवली ता.१४-: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध विहार परिसरातील डाॅ. आबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, कणकवली शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, श्री. कदम, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, दिपेश सावंत, उदय सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अबीद नाईक यांच्याकडून डाॅ. आंबेडकरांना अभिवादन…
