सायंकाळी ८.३० वाजता आमदार जीत आरोलकर यांच्या विरनोडा निवासस्थानी घेणार बैठक..
मांद्रे/प्रतिनिधी
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज सायंकाळी ८.३० वाजता विरनोडा गोवा येथे आमदार जीत आरोलकर यांच्या बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी प्रचारासंदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. मांद्रे मतदारसंघातून श्रीपाद भाऊ यांना अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.
भाजपचे उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार श्रीपाद भाऊ नाईक यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज आमदार जीत आरोलकर यांच्या मांद्रे मतदारसंघात आज आहेत.
