मठ येथे दुचाकी व चारचाकी चा अपघात…

गाड्यांचे नुकसान : वेंगुर्ले येथील युवती गंभीर जखमी.

⚡वेंगुर्ले ता.१२-: वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावर मठ येथील मंदार कामात यांच्या गॅरेज समोर गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मारुती ओमनी आणि दुचाकी या दोन गाड्यांमध्ये अपघात झाला. अपघातात गाड्यांचे नुकसान झाले असून दुचाकीवरील युवती गंभीर जखमी झाली. तिला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. अपघात प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेंगुर्ला येथील लक्ष्मण सतीश वराडकर हा काल रात्री त्याच्या टिव्हीएस कंपनीची रायडर मोटार सायकल क्र. एमएच ०७ एक्यु ८७०४ वरून मैत्रीण दुर्वा मोर्जे, हिला वेंगुर्ला येथे घरी सोडण्यासाठी जात होता. याच वेळी मठ या ठिकाणी समोरून येणाऱ्या चारचाकी मारुती ओमनी वाहन क्रमांक एम एच ०७ क्यू ३३९७ या गाडीची दुचाकीला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दूचाकीवर मागे बसलेली दुर्वा मोर्जे हिला गंभीर दुखापत झाली असून तिच्या पायाला मोठा मार बसला आहे. तत्काळ तेथील ग्रामस्थांनी तिला उपचारासाठी वेंगुर्ले रुग्णालयात हलविले. आणि अधिक उपचारासाठी तेथून गोवा बांबुळी येथे हलविले आहे.
अपघातात गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असून वेंगुर्ले पोलीस ठाण्यात ओमनी चालक भगवान लक्ष्मण कोचरेकर, वय २३ वर्ष राहणार तुळस याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सराफदार करत आहेत.

You cannot copy content of this page