रामेश्वर मांड मित्रमंडळाच्या खेळ पैठणीचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡मालवण ता.१२-: मालवण सोमवार पेठ येथील रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित खेळ पैठणीचा या स्पर्धेत सौ. स्वीटी विशाल मोहिते या विजयी होऊन पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर द्वितीय क्रमांक सोन्याच्या नथीच्या मानकरी सौ. मैथिली महेश मेस्त्री आणि तृतीय क्रमांक मिक्सर च्या मानकरी सौ. प्रांजली प्रशांत लाड या ठरल्या.
मालवण सोमवार पेठ येथील श्री रामेश्वर मांड येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. गुढीपाडव्यादिवशी रामेश्वर मांड येथे श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. यानिमित्त आयोजित आधारकार्ड दुरुस्ती व नेत्र तपासणी या शिबिरासाठी पाचशे लोकांनी उपस्थिती दर्शवित लाभ घेतला. या शिबिरासाठी मालवण डिजिटल केबल नेटवर्क मुकेश बावकर यांनी इंटरनेट सुविधा पुरवून मंडळाला सहकार्य केले. तसेच पूजेच्या दुसऱ्या दिवशी रक्तांग जन्म हा दशावतारी नाटयप्रयोग सादर झाला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तर तिसऱ्या दिवशी भंडारी हायस्कुलच्या पटांगणावर महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्या महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या सर्व कार्यक्रमांसाठी मंडळातील सदस्य सदा चुरी, छोटू तारी, दिलीप वांगणकर, संतोष खराडे, प्रसाद आरोंदकर, योगेश कांबळे, केदार सावंत, शिवाजी म्हापणकर आदी व इतरांचे सहकार्य लाभले.
