वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून सौ. संगीता महाडिक यांची निवड…

⚡मालवण ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय पर्यटनाला मोठा वाव आहे. वैद्यकीय पर्यटन या क्षेत्रामध्ये पर्यटन महासंघ पुढाकार घेणार असून जिल्ह्याला वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात एक वेगळी ओळख मिळवून देण्याचा मानस पर्यटन महासंघाचा असून यासाठी वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून सौ. संगीता महाडिक यांची निवड पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्याकडून जाहीर करण्यात आली. यावेळी पर्यटन संचानालय कोकण विभाग उपसंचालक यांच्या उपस्थितीत सौ. संगीता महाडिक यांच्याकडे जबाबदारी सोपवून सत्कार करण्यात आला.

सौ. संगीता महाडिक या आजोळ, ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन व सेवा केंद्र, नेरुर, कुडाळ सिंधुदुर्गच्या संचालक असून त्यांनी पर्यटन महासंघाने दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आठही तालुक्यात वैद्यकीय पर्यटन वाढीसाठी आपण काम करणार असल्याचा मानस व्यक्त केला. यावेळी रविकिरण तोरसकर, मंगेश जावकर, अन्वेषा आचरेकर व अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page