केसरकर- तेली यांचं मनोमिलन फक्त निवडणुकीच्या स्वार्थासाठी…

रूपेश राऊळ: मात्र विधानसभेत केसरकर-तेली एकमेकांवर दगड मारताना दिसतील..

सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्गच्या विकासासाठी कधीही एकत्र न आलेले केसरकर- तेली हे निवडणुकीच्या तोंडावर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. परंतु हे मनोमिलन फार काळ टिकणार नसून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे दोघे एकमेकांवर दगड मारताना दिसतील अशी टीका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केली.

दरम्यान केसरांनी एक लाख मताधिक्य देण्याची भाषा करण्यापेक्षा आदी उमेदवारी जाहीर करा आणि मग मतदिकय देण्याची भाषा करा असं टोला देखील श्री.राऊळ यावेळी लगवला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले निवडणुका आल्या की केसरकर यांना जनतेला कोंबड्या बकऱ्या वाटण्याची सवयच आहे. निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्गात कोंबड्या बकऱ्या या रोगी निघाल्याने आणि मरून गेल्याने लाभार्थ्यांचे मोठे नुकसान झाले मुळात याचा जास्त फटका हा स्थानिक बकरी पाळणाऱ्या धनगर समाजाला बसला. कारण संसर्गजन्य रोग इतर धनगर समाजाच्या बकऱ्यामध्ये पसरला आहे याला सर्वस्वी जबाबदार मंत्री केसरकर असून स्वस्तात मिळालेल्या बकऱ्या त्यांनी लाभार्थ्यांच्या माती मारल्या याची चौकशी होणे गरजेचे आहे आणि तशी मागणी ही आपण केली आहे.असे श्री राऊळ यावेळी बोलताना म्हणाले.


श्री परब म्हणाले दहा वर्षात दहशतवादाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या केसरकर यांना आज दहशतीच्याच पंखाखाली लपण्याची वेळ आली आहे त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळण्यासाठी ही दहशतीच्या पंखाचीच गरज असल्याचे समजल्याने त्यांनी आपली भूमिका वेळीच बदलली आहे तर केवळ विकासाच्या वल्गना करणाऱ्या केसरकर यांनी काही उद्योग या ठिकाणी आणला नाही आडाळीमध्ये उद्योग आणण्याची पोकळ आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही त्यामुळे जनता किती झा ले तरी उबाठा सेनेच्या मागेच उभे राहणार असा विश्वास श्री.गवस यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page