सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१२-: सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी युवा संदेश प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .
यामध्ये इ . ७ वी तील कु . वसंत संदीप गवस याने १४० गुण मिळवून सिल्वर मेडल , तर कु. देवार्य तुषार परुळेकर याने १२२ गुण मिळवून ब्रॉन्झ मेडल मिळवले. तसेच इ . ३ री तील कु .विहान तुषार परुळेकर, इ. ६ वी तील कु . आर्य दिनानाथ माणगावकर , कु . वैष्णवी संजय पालकर , कु.समर्थ रामचंद्र सावंत, कु . अनुष्का सुभाष गावडे तसेच इ . ७ वीतील कु .श्रेयस साईनाथ वंजारी , कु . चिराग कुमार नेरुरकर हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले .या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. प्रितम गोंगाणे यांनी मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .

You cannot copy content of this page