मिलाग्रीस हायस्कूलमध्ये समर कॅम्पचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१२-: मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालाचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून दि.15 एप्रिल 2024 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
हा कॅम्प सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. यात विविध प्रकारचे खेळ बास्केटबॉल, हँडबॉल ,फुटबॉल ,वॉलीबॉल, कॅरम, बॅडमिंटन आधी घेण्यात येणार आहेत. या सर्व खेळांसाठी तज्ञ मार्गदर्शक व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याव्यतिरिक्त संगीत, कला, कार्यानुभव, ध्यान या गोष्टींमध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सुवर्णसंधी असेल. या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी प्रेरक व्याख्यान, फनी गेम्स, वॉटर गेम्स यांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे .विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या कॅम्प मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी ७७७६८२८३३० या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. या कॅम्प चे उद्घाटन दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी प्रशालेच्या आवारात होईल असे कळविण्यात आले आहे. हा समर कॅम्प नि:शुल्क असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page