युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची टीका; नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किती विकास केला.?
⚡कणकवली ता.१०-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किती विकास केला आहे, किती जणांना रोजगार दिला आहे, याबाबत आमदार नीतेश राणे यांनी आपल्या वडिलांना जाब विचारला हवा, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.नीतेश राणे हे दुसरे किरीट सोमय्या आहेत, असा टोला नाईक यांनी राणेंना लगावला आहे.
कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधताना श्री. नाईक बोलत होते. यावेळी तेजस राणे, गुरु पेडणेकर, उद्धव पारकर हे उपस्थित होते
ठाकरे शिवसेनेचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत यांच्यावर नीतेश राणे दररोज प्रेस घेऊन टीका व आरोप करीत आहेत. मागील 10 वर्षांत खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय विकासात्मक कामे केली असा सवाल नीतेश राणे करीत आहे. मात्र, आपले वडील मागील 32 ते 35 वर्षे मंत्री आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात्मक कामे, किती जणांनी रोजगार दिला, याचा जाब नीतेश राणेंनी आपल्या वडिलांना विचारावा, अशा शब्दांत नाईक यांनी राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दररोज प्रेस घेऊन विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी, सीबीआयची धमकी द्यायचे. मात्र, आज त्यांची अवस्था काय आहे, ही सर्वांनी माहिती आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनी मुलाखत देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला दररोज विरोधाकांवर बेछुट आरोप करायला सांगते होते, असा खुलासा सोमय्यांनी केला होता. आता नीतेश राणे हे दुसरे किरीट सोमय्या असून देवेंद्र फडणवीस त्यांची देखील सीडी बाहेर काढतील, असा दावा श्री. नाईक यांनी केला.
