ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत कोळंब कातवड प्राथमिक शाळेचे यश…

⚡मालवण ता.१०-: ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंब कातवड शाळेचे ३ पैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कु. वेदराज अंकुश कणेरकर (इयत्ता- दुसरी) याने १०० पैकी ९८ गुण प्राप्त करत गोल्ड मेडल मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर ऑल इंडिया रँकमध्ये तो २९ वा आला. तसेच कु. सुनंदा आनंद धुरी (इ.२ री -८८ गुण) हिने ब्रॉन्झ मेडल पटकावले. आणि कु. रिमा अभिजित शृंगारे हिने ६३ गुण मिळविले. या यशाबद्दल कोळंब केंद्रप्रमुख श्रीकृष्ण बागवे, शाळा व्यवस्थापन समिती कोळंब कातवड आणि शालेय शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page