⚡मालवण ता.१०-: देवबाग येथील श्री चेतन हनुमान मंदिराच्या नूतन वास्तू मध्ये दि. २१ एप्रिल रोजी श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व दि. २३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात दि. १९ ते २६ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वा. हनुमान मूर्ती मिरवणूक सोहळा – श्री विठ्ठल मंदिर ते महापुरुष मंदिर ते हनुमान मंदिर सोबत – स्वराज ढोल-ताशा पथक, मालवण, शनिवार दि. २० रोजी सकाळी ७.३० वा. सुहासिनीची जलकलश मिरवणूक (महापुरुष मंदिर ते हनुमान मंदिर) सकाळी ८ वा. मंगलाचरण प्रायश्चित, देवतावंदन, गणेश पूजन, संभारदान, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्रद्ध. जलाधिवास, अग्निस्थापना, लघुपूर्णावधी नैवेद्य व इतर धार्मिक विधी होणार आहेत. रविवार दि. २१ रोजी सकाळी ८ वा. मंगलचरण, शांतीपाठ, प्रकारशुदधी, स्थापित देवता पुजन, तत्व न्यास होम, सकाळी ११ वा. मूर्ती स्थापना महापूजा आरती (तिर्थप्रसाद व अल्पोपहार) दुपारी १२ वा. प्राणप्रतिष्छ, पूर्णाहूती, अभिषेक, मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वा. ह.भ.प. विलास केरकर बुवा यांचे सुश्राव्य किर्तन, सकाळी ७ वा. हनुमान जन्म, सकाळी ७.३० वा. तिर्थप्रसाद, दुपारी ३ वा. मुलांचे खेळ, सायं. ७ वा. भजने, रात्रौ १० वा. मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
बुधवार दि. २४ एप्रिल रोजी सायं. ७ वा. विठ्ठल रखुमाई दिंडी भजन मंडळ, आचरा देऊळवाडी बुवा – लवू घाडी (६० जणांच्या मेळाव्यात देखावा व ट्रिकसीन भजन), रात्रौ १० वा. मामा मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग फुटला पाझर पाषाणाला (सौजन्य- श्री. संतोष मधुकर निकम).
गुरुवार दि. २५ रोजी दुपारी १२:३० वा. महाप्रसाद रात्रौ ठिक १० वा. राज्यस्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असून यातील विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी रात्रौ १० वा. श्री रामेश्वर प्रॉडक्शन मुंबई यांचे दोन अंकी धम्माल विनोदी नाटक ‘गंमत प्रेमाची’ (लेखक: अशोक पाटोळे, दिग्दर्शक: बाबा कांदळगांवकर सौजन्य जी. जी. गावडे -हॉटेल अनमोल) हे सादर होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
