तोंडवळी वाघेश्वर मंदिर परिसरातील हायमास्ट टॉवर बंद…

संबंधीत विभागाने तात्काळ कार्यवाही करावी:भिकाजी गोलतकर यांची मागणी…

⚡मालवण ता.०७-: मालवण तालुक्यात तोंडवळी येथील श्री वाघेश्वर मंदिर नजीकचा हायमास्ट टॉवर गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात काळोखाचे साम्राज्य पसरत असून यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे, याप्रकरणी संबंधीत विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी तोंडवळी येथील भिकाजी गोलतकर यांनी केली आहे.

तोंडवळी येथील श्री वाघेश्वर मंदिरात गुढीपाडव्यापासून राम नवमीपर्यंत रात्री आरती, कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. या काळात हायमास्ट बंद असल्याने या काळात ग्रामस्थ व भाविकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे ही गैरसोय लक्षात घेऊन संबंधीत विभागाने त्वरित कार्यवाही करत हा हायमास्ट दुरुस्त करून तो प्रकाशमान करावा, अशी मागणी गोलतकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page